२५ डिसेंबर पांचाळ स्वाभिमान दिन
schedule08 Feb 21 person by visibility 3310 category

*जय विश्वकर्मा*
*२५ डिसेंबर*
*"पांचाळ स्वाभिमान दिन"*
*( ब्रम्हश्री, बाळशास्त्री क्षीरसागर जयंती )*
*विश्वकर्मा विश्वब्राम्हण कुळात जन्म घेणारे ब्रम्हश्री बाळशास्त्री रावजिशास्त्रि क्षिरसागर यांचा जन्म २५ डिसेंबर १८७६ ( पौष शु.९ शके १७९८ ) आणि मृत्यू ६ ऑक्टोंबर १९४३ ( अश्विन शु.६ शके १८६५ ) मध्ये झाला यानी जे विश्वकर्मा धर्मासाठी जे कार्य केले ते अलौकिक आणि अद्वितीय असे कार्य आहे.*
*कारण आज आम्ही "पांचाळ विश्वब्राम्हण" म्हणून सांगतो ते केवळ ब्रम्हश्री बाळशास्त्री मुळे. पेशवे राजवटी मध्ये पांचाळ विश्वब्राम्हणांवर अनेक अत्याचार पेशव्यांनी केले परंतु बाळशास्त्रींनी "पांचाळ विश्वब्राम्हण" हे सर्वात महाश्रेष्ठ ब्राह्मण आहेत हे साबीत करून दाखवले. हे पांचाळ विश्वब्राम्हणांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.*
*आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे "पांचाळ विश्वब्राम्हण" या समाजात मानवास गरजेच्या असणाऱ्या काही कारागिरीपैकी लोह, काष्ठ, ताम्र-पितळ, पाषाण ( दगड ), सोने-चांदी या पाच कारागिरीचे पिढीकर्म आहे. याचीही समाजाच्या शास्त्रात नोंद आहे.*
*बाळशास्त्रींनी भारतीय संस्कृतीमधील अतिशय दुर्मिळ ग्रंथ साहित्याचा अभ्यास करून, त्यांनी पांचाळ समाजासाठी "विश्वब्रम्हकुलोत्साह" हा अनमोल ग्रंथ लिहला. देशातील इतर भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. तसेच पांचाळासांठी हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे.( ते पिढीकर्माने सोनार होते ) त्यांचे हे कार्य, त्यांची ग्रंथ संपदा महाराष्ट्रातीलच नाही देशातील लोहार, सुतार, तांबट, पाथरवट, सोनार या सर्व पिढीकर्माच्या पांचाळांसाठी खूप मोठे उपकार आहेत.*
*बाळशासत्री क्षीरसागर यांना इंग्रजांनी मरणोत्तर ब्रम्हश्री हा पुरस्कार दिला.*
*समाजासाठी त्यांनी जे अनमोल कार्य केले. त्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्यी जयंती २५ डिसेंबर रोजी "पांचाळ स्वाभिमान दिन" म्हणून साजरा होतो, आणि करायलाही हवा.*