नैतिकता, कौशल्य, उद्यमशीलता, ज्ञान निरंतर तेव्हाच असताल या जगामध्ये सतत अग्रेसर

रजि. नं. : E-6958-P

नियमित देखभाल, दुरुस्ती, विस्तार व पुनर्बांधणीकरिता काही कालावधीसाठी साइट बंद राहील याबद्दल क्षमस्व.

जाहिरात

 

समाज भूषण पुरस्कार आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२३

schedule02 Aug 23 person by visibility 783 category

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट पुणे 

व सदभाव गतिविधि आयोजित

समाज भूषण आणि विद्यार्थी गुणगौरव रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी अतिशय सूत्रबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला !
या सोहळ्यास संपूर्ण देशवासीयांना अभिमान आहे अश्या भारत सरकारच्या संरक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ, वर्ग १ राजपत्रित अधिकारी डाँ अशोकजी गोविंद नगरकर हे प्रमुख अतिथी / मार्गदर्शक नात्याने उपस्थित होते.

या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सन्माननीय व्यक्तिमत्त्वाचा  समाज भूषण २०२३ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ते पुरस्कारार्थी

१.वनिता जगदेव बोराडे
(हिवरा आश्रम, जि. बुलढाणा)
जागतिक प्रथम महिला सर्पमित्र

२.आशा ज्ञानेश्वर सोनावणे (धुळे)
शैक्षणिक - बुध्दी व कौशल्य विकास

३.अपेक्षा अनघा अनिल सुतार (रत्नागिरी)
क्रीडा - खो-खो शिवछत्रपती पुरस्कारार्थी २०२१-२२

४.राजेश नर्मदा बाबुराव भालेकर (जालना)
पुनर्विवाह - सामाजिक सदभाव

५.राहुल अलका अर्जुन वाघमोडे (माळशिरस, जि.सोलापूर)
करिअर मार्गदर्शन व अनाथांचा नाथ

६.दिपक वत्सला हनुमंत जेवणे ( पुणे-नागपूर)
संत साहित्य, चरित्र लेखन व पत्रकारिता

७.भागीनाथ शोभा बाबासाहेब आसने (कोपरगाव जि. अहमदनगर)
कृषी - आधुनिक प्रगत युवा शेतकरी

या सोबतच उच्च शिक्षण, विशेष प्राविण्य, विशेष उल्लेखनीय, युवा विशेष सन्मान अश्या वय वर्षे १० ते ४० वयोगटातील १७ मुला, मुली आणि युवकांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले त्याच बरोबर ६५ हून अधिक १० व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव वरिष्ठ शास्त्रज्ञ व समाज भूषण पुरस्कारार्थी यांच्या हस्ते करून त्यांना भविष्यात त्यांनाही असे देशासाठी, समाजासाठी उल्लेखनीय कार्य आपण करावे ही प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने या एकत्रितरित्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याची काही क्षणचित्रे....

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Vishwakarma Foundation Pune.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes